ICHMH51NEWS.IN
9921600800

सेप्टिक टँक उपसा कराला स्थगिती द्या – काँग्रेसचे शशांक बावचकर यांची आयुक्तांकडे मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सेप्टिक टँक उपसा कराला स्थगिती द्या – काँग्रेसचे शशांक बावचकर यांची आयुक्तांकडे मागणी

इचलकरंजी:
 इचलकरंजी महानगरपालिकेने शहरातील काही मिळकत धारकांवर लादलेला ‘सेप्टिक टँक उपसा कर’ तात्काळ स्थगित करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे सचिव व नगरसेवक शशांक मल्हारराव बावचकर यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महानगरपालिकेने मालमत्ता करात समाविष्ट करून दरवर्षी ७५० रुपये आगाऊ शुल्क सेप्टिक टँक उपसासाठी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका सुमारे २३,८०५ मिळकत धारकांना बसणार असून, त्यात भोने माळ (वार्ड ९), शहापूर, कबनूर आणि वाढीव भागातील नागरिकांचा समावेश आहे.
बावचकर यांनी स्पष्ट केले की, सेप्टिक टँक उपसाची जबाबदारी ही पूर्णतः महानगरपालिकेची असून, त्यासाठी मक्तेदारी पद्धतीने सेवा देऊन त्याचा खर्च नागरिकांवर लादणे अन्यायकारक आहे. त्यांनी हेही निदर्शनास आणून दिले की, २०१४ साली सुरू झालेल्या ९८.५० कोटींच्या भुयारी गटार योजनेची संपूर्ण अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, ही पालिकेची अपयशाची कबुली आहे.
तत्कालीन आयुक्तांच्या प्रशासकीय ठराव क्रमांक ८४ (दि.६ मार्च २०२४) अंतर्गत हा कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या ठरावाला स्थगिती देण्याची आणि संबंधित नागरिकांवरील ७५० रुपयांचा कर माफ करण्याची मागणी बावचकर यांनी केली आहे. अन्यथा, संबंधित भागातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा