ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेला ६५७ कोटींचा जीएसटी परतावा मंजूर — आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेला ६५७ कोटींचा जीएसटी परतावा मंजूर — आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश

इचलकरंजी:

इचलकरंजी महानगरपालिकेला तब्बल ६५७ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा मंजूर करण्यात आला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. आमदार राहुल आवाडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या निर्णयाला यश आले असून, शहराच्या विकासासाठी ही आर्थिक मदत फार मोठी ठरणार आहे.

२०२२ मध्ये इचलकरंजी नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर जीएसटी परताव्याचा मुद्दा प्रलंबित होता. २०१७ मध्ये राज्यातील महानगरपालिकांना जीएसटी परतावा देण्याचा निर्णय झाला होता, मात्र त्यात इचलकरंजीचा समावेश नव्हता. परिणामी, इचलकरंजी महानगरपालिकेला सुमारे १२०० कोटी रुपयांचा परतावा मिळालेला नव्हता.

आमदार राहुल आवाडे यांनी सतत शासन दरबारी पाठपुरावा करत हा मुद्दा अधोरेखित केला. मार्च महिन्यात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला गती मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीतील विकास पर्व महासभेत जीएसटी परतावा लवकर मंजूर करण्याची ग्वाही दिली होती. याला आठवड्याभरातच मूर्त स्वरूप मिळाले.

प्राप्त माहितीनुसार, ६५७ कोटींचा हा परतावा आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने इचलकरंजी महानगरपालिकेला दिला जाणार आहे. या निर्णयामुळे शहरातील रखडलेली विकासकामे वेग घेतील आणि नागरी सुविधा उन्नत होण्यास हातभार लागेल.

आमदार राहुल आवाडे यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, “महानगरपालिकेच्या जकात रद्दीनंतर जीएसटीच्या माध्यमातून मिळणाऱ्या नुकसानभरपाईबाबत अन्याय झाला होता. मात्र या निर्णयामुळे त्या अन्यायाला वाचा फुटली असून विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.”या निर्णयामुळे इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच मोठी चालना मिळणार आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा