ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागतील १६० विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर्स डीकेटीईचा इंटर्नशिप मॉडेल ठरतोय यशस्वी करिअरची गुरुकिल्ली.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागतील १६० विद्यार्थ्यांना प्री-प्लेसमेंट ऑफर्स डीकेटीईचा इंटर्नशिप मॉडेल ठरतोय यशस्वी करिअरची गुरुकिल्ली.

इचलकरंजी:

येथील डीकेटीई इन्स्टिटयूटने पुन्हा एकदा उदयोगाभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. संस्थेच्या प्रभावी इंटर्नशिप योजनेअंतर्गत इंजिनिअरींगमधील १६० हून अधिक विद्यार्थ्यांना हेक्सावेअर, डॅनफोस, सायन एनर्जी, व्ही डिझाईन, फेव्हिनो, कॉटमॅक यासह दिग्गज आयटी व इंजिनिअरींग क्षेत्रातील देशविदेशातील नामांकित कंपन्याकडून थेट प्री-प्लेसमेंट ऑफर्स (पीपीओ) प्राप्त झाल्या आहेत.

इंटर्नशिप योजना ही डीकेटीईच्या शैक्षणिक बांधणीचा मुलभूत भाग असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औदयोगिक वातावरणात कार्यानुभव मिळवून देते. याच अनुभवाच्या बळावर विद्यार्थ्यांना अंतिम वर्षापूर्वीच नोकरीची हमी मिळाली आहे. डीकेटीईमध्ये उदयोगाच्या गरजा लक्षात घेवून बनविलेले अभ्यासक्रम, प्रयोगशिल प्रकल्प, व्यावहारिक प्रशिक्षण व कौशल्यविकासावर अधारित शिक्षणपध्दती यामुळे येथील विद्यार्थी सक्षम इंजिनिअर म्हणून इंडस्ट्रीमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहेत. हे यश पुन्हा एकदा सिध्द करते की, डीकेटीई ही संस्था उदयोगसज्ज, कार्यक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करु शकणारे विद्यार्थी घडवित आहेत.

संस्थेच्या डायरेक्टर डॉ एल.एस.अडमुठे यावेळी बोलताना म्हणाल्या की, डीकेटीईमध्ये आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांनाचा सर्वांगीण विकास, उदयोगाभिमुख कौशलयवाढ आणि करिअर संधी यावर भर दिला आहे. १६० विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्री-प्लेसमेंट ऑफर्स हे त्यांच्या मेहनतीचे, आमच्या गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमाचे आणि उदयोगांशी असलेल्या घनिष्ठ संबंधाचे फलित आहे. भविष्यातही आम्ही अशाच यशोशिखराकडे वाटचाल करत राहू.

विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड होण्यासाठी सॉफ्ट स्कीलवरील चाचण्या, तज्ञांकडून मार्गदर्शन सत्रे, तसेच टेक्नीकल मुलाखातींसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे डीकेटीईचे विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्टया नव्हे तर व्यावसायिकदृष्टयाही सक्षम बनत आहेत आणि उदयोजगतात यशस्वीपणे आपली छाप पाडत आहेत.

विद्यार्थ्यांस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस डायरेक्टर डॉ. एल. एस. अडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, सर्व विभागप्रमुख, टीपीओ प्रा.जी.एस.जोशी, व टीपीओ कोऑर्डिनेटर यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळी ः डीकेटीईचे विविध कंपनीत प्रिप्लेसमेंटसाठी निवड झालेले विद्यार्थी.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा