ICHMH51NEWS.IN
9921600800

पुर परिस्थिती निर्माण झालेस इचलकरंजी  शहरातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने  सामोरे जावुया :-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुर परिस्थिती निर्माण झालेस इचलकरंजी  शहरातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने  सामोरे जावुया :-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

इचलकरंजी
               कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या मागील काही वर्षाच्या महापुराच्या  पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार  संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करणेसाठी शहरातील महसूल, पोलिस, पाटबंधारे विभाग, विद्युत वितरण कंपनी, बी.एस.एन.एल, सार्वजनिक आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग या सर्व शासकीय विभागांचे सहकार्याने संभाव्य पूर परिस्थितीवर मात करता यावी
 या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी आज गुरुवार दि.२९ मे रोजी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्तांनी  इचलकरंजी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पुर्वतयारी आढावा बैठकीचे  आयोजन  केले होते.
     बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या पुर्वतयारी बाबतची सविस्तर माहिती विषद केली. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संजय कांबळे यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा सादर केला.
       आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी  मागील महापुराची माहिती घेऊन पुर  परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही यासाठी सुक्ष्म आणि काटेकोर नियोजन करणेच्या सूचना सर्व संबंधित घटकांना देऊन  शहरातील सर्व शासकीय यंत्रणा सामाजिक तथा स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून संभाव्य महापुराच्या परिस्थितीस सामोरे जावुया असे प्रतिपादन करुन
 पुर परिस्थितीमध्ये सर्वच शासकीय विभागांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपत्कालीन पथके सतर्क ठेवावीत तसेच २४ तास आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडील यंत्रणा कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय प्रशासनाने पुर परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक असलेली औषधे तसेच सर्पदंश, श्वानदंश यावरील लसीसह कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेला औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा,
 महानगरपालिका आरोग्य विभागाकडून औषध फवारणी, फॉगिंग यासाठी आवश्यक असलेला केमिकलचा साठा पुरेसा उपलब्ध करून ठेवावा अशा महत्त्वपूर्ण सुचना देवुन सर्वच शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावे अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिल्या.
        याप्रसंगी  उपायुक्त नंदु परळकर , उपायुक्त अशोक कुंभार,  सहा आयुक्त विजय राजापुरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.भाग्यरेखा पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, महावितरणचे  अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे,  पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आर.बी.जंगम, बी.एस.एन. एल. चे मनोजकुमार आवळे, एस.पी.पवार, सार्व.बांधकाम हातकणंगले सेक्टर अभियंता पी.टी.मोरे, इचलकरंजी आगार प्रमुख सागर पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, सहा.नगर रचनाकार हरिश्चंद्र पाटील, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर , अभियंता बाजी कांबळे, पाटबंधारे विभागाचे वैभव कोळेकर, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, विद्युत अभियंता इसरार बेग,वाहन अधिक्षक प्रशांत आरगे, उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे,अजय सुतार, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे उपस्थित होते.
     आपत्ती व्यवस्थापन बैठकीत चर्चा करताना आयुक्त पल्लवी पाटील व अधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा