ICHMH51NEWS.IN
9921600800

शहापूर येथे मोटारसायकलची पादचाऱ्यास धडक – एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहापूर येथे मोटारसायकलची पादचाऱ्यास धडक – एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल.

इचलकरंजी

मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास शहापूर येथील गणेशनगर गल्ली क्रमांक ८ मध्ये एका भरधाव मोटारसायकलने पादचाऱ्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी रविंद्र भुजगोंडा पाटील (वय ५५ रा. भारतमाता हौसिंग सोसायटी, गंगानगर कबनूर) गंभीर जखमी झाले होता. जखमीवर सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना दिनांक बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी किरण रविंद्र पाटील (वय २३, रा. भारतमाता हौसिंग सोसायटी, गंगानगर कबनूर) यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून पोलिसांनी इर्शाद रियाज देसाई (रा. गणेशनगर, गल्ली नं. ९, शहापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने होंडा कंपनीची एक्स्ट्रीम मोटारसायकल (MH-५१-D-४८४६) ही निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून यांना जोरात धडक दिल्याने पाटील अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर हे करीत आहेत

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा