ICHMH51NEWS.IN
9921600800

रस्त्यावर अथवा इतरत्र उघड्यावर कचरा टाकलेस दंडात्मक कारवाही होणार-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रस्त्यावर अथवा इतरत्र उघड्यावर कचरा टाकलेस दंडात्मक कारवाही होणार-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

इचलकरंजी
    इचलकरंजी शहरातील अनेक नागरिक आणि छोटे- मोठे व्यावसायिक, हातगाडी चालक आपल्याकडे जमा होणारा सर्व प्रकारचा कचरा महानगर पालिकेच्या घंटागाडीत न टाकता रस्त्यावर, गटारी मध्ये तसेच उघड्यावर टाकत असल्याचे त्याचबरोबर काही नागरिक बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच टाकत असल्याचे महानगर पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येत आहे.
   सदर गंभीर बाब लक्षात आल्याने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अशा बेजबाबदार नागरिक तसेच व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्याचे सक्त आदेश आरोग्य विभागात दिलेले आहेत.या अनुषंगाने महानगरपालिका आरोग्य विभागाकडून बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकले बद्दल अशोक पारख या नागरिकाकडून रुपये १०००/- इतका दंड आकारण्यात आला.
  तसेच उघड्यावर कचरा टाकले बद्दल  दामोदर जासु या नागरिकाकडून  रुपये १८०/- तर समाधान इडली या व्यावसायिका कडून रुपये ५००/- इतका दंड आकारण्यात आला आहे.
    तरी शहरातील नागरिक आणि तसेच व्यावसायिकांनी आपल्याकडे जमा होणारा सर्व प्रकारचा कचरा महानगर पालिकेच्या घंटागाडीतच टाकावा, इतरत्र कचरा टाकलेला  आढळून आलेस संबंधितावर दंडात्मक कारवाई करणेत येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे कडून देण्यात येत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा