इचलकरंजीत भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार; डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
इचलकरंजी:
शहरातील पाटील मळा परिसरात स्वराज गॅरेज समोर शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत व्यक्तीचे नाव राजेंद्र शिवाजी चोपडे (वय ५८ रा. खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे आहे. ते त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकी (MH 09 DH 5220) वरून इचलकरंजीहून खोतवाडी येथे जात असताना दुपारी १.१५ च्या सुमारास स्वराज गॅरेज समोर समोरून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (MH 20 AT 8593) त्यांना उडवले. अपघात इतका गंभीर होता की चोपडे यांचा जागीच मृत्यू झाला.
डंपर चालक दावलमलिक अल्लाबक्ष छपरबंद (वय ३१, रा. येनकेंची, ता. सिध्धगिरी, जि. विजापूर, कर्नाटक – सध्या रा. शामनगर, जयसिंगपूर) याने अपघातानंतर घटनास्थळावर न थांबता पलायन केले. यामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या अपघाताची फिर्याद प्रविण राजेंद्र चोपडे (वय ३३, रा. खोतवाडी) यांनी इचलकरंजी पोलीस ठाण्यात दिली.या प्रकरणाचा तपास पो.नि. महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुनम माने करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







