महानगरपालिका वर्धापन दिन व जागतिक सायकल दिनानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधत तसेच जागतिक सायकल दिनानिमित्त एक भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विविध क्रीडा संघटना, तसेच शहरातील सायकलिंग ग्रुप्स सहभागी होणार आहेत.
ही रॅली उद्या मंगळवार, दि. ३ जून २०२५ रोजी सकाळी श्री शिवतीर्थ येथून सुरु होणार असून, रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे – श्री शिवतीर्थ – महात्मा गांधी चौक – राजवाडा चौक – घोरपडे नाट्यगृह – चांदणी चौक – संभाजी चौक – शिवतीर्थ – महानगरपालिका मुख्य कार्यालय.
या उपक्रमाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करणे व सायकलचा पर्यावरणपूरक वापर प्रोत्साहित करणे हे आहे. यानिमित्ताने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







