ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद; ४२८ युवक-युवतींना नोकरीची संधी,वर्धापनदिन कार्यक्रमाची सुरवात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद; ४२८ युवक-युवतींना नोकरीची संधी,वर्धापनदिन कार्यक्रमाची सुरवात

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या श्रृंखलेत आज राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यास इचलकरंजी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

इचलकरंजी महानगरपालिका, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनरोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलरोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचा उद्घाटन सोहळा माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, आमदार डॉ. राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाला.

या मेळाव्यात ५० हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक, इन्शुरन्स, हॉटेलिंग, डिजिटल वर्क, कुरिअर, ऑफिस व लेबर वर्क अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांनी बेरोजगार युवक-युवतींसाठी संधी उपलब्ध करून दिल्या.मेळाव्यात एकूण २३८७ उमेदवार उपस्थित राहिल असून त्यातून ४२८ उमेदवार नोकरीसाठी थेट निवडले गेले तर ९३६ उमेदवाराना फेर मुलाखतीसाठी बोलावले गेले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, सहायक आयुक्त विजय राजापुरे, तसेच ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनरोटरी क्लब परिवार, आणि महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील ७५ विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करताना ज्ञानेश्वर मुळे, आ.राहुल आवाडे,पल्लवी पाटील व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा