ICHMH51NEWS.IN
9921600800

चल भावा सिटीत’ कार्यक्रमाचे विजेते ऋषिकेश चव्हाण आणि श्रुती रावळ यांचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सत्कार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चल भावा सिटीत’ कार्यक्रमाचे विजेते ऋषिकेश चव्हाण आणि श्रुती रावळ यांचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सत्कार.

इचलकरंजी – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इचलकरंजी शहराच्या ऋषिकेश चव्हाण व श्रुती रावळ या दोघांचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गौरव करण्यात आला.

महानगरपालिकेचे कर्मचारी युवराज चव्हाण यांचे सुपुत्र ऋषिकेश चव्हाण व त्यांची सहभागी श्रुती रावळ यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते व उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी सहायक आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहायक आयुक्त रोशनी गोडे, अमृत भोसले, मनोज हिंगमिरे आदी मान्यवर तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यशाबद्दल दोघांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला असून, त्यांनी इचलकरंजी शहराचे नाव राज्य पातळीवर उज्वल केल्याबद्दल नागरिकांमधून अभिमान व्यक्त केला जात आहे. महानगरपालिकेच्यावतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ऋषिकेश चव्हाण व श्रुती रावळ यांचा सत्कार करताना आयुक्त पल्लवी पाटील व मनपा पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा