इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन व जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात संपन्न
इचलकरंजी – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त व जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून, इचलकरंजी महानगरपालिका व शहरातील विविध क्रीडा तसेच सायकल संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. ३ जून रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीचा शुभारंभ शिवतीर्थ येथून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवतीर्थपासून सुरु झालेली ही रॅली महात्मा गांधी चौक, राजवाडा चौक, चांदणी चौक, संभाजी चौक, छत्रपती शाहू महाराज पुतळा अशा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर समारोपाला पोहोचली.
“पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन” हा सकारात्मक संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये शहरातील विविध संस्थांचे उत्स्फूर्त आणि व्यापक प्रतिसाद लाभला. यामध्ये सहायक आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, डॉ. सिमोन आवळे, सहायक आयुक्त रोशनी गोडे, मुख्याध्यापक शंकर पोवार, क्रीडा अधिकारी संजय शेटे, संजय कांबळे, सचिन खोंद्रे, कृष्णा गोंदुकुपे, शिवाजी शिंदे, महेश शेळके, डॉ. केतकी साखरपे, अमरपाल कोहली यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
तसेच आय.एम.फीट क्लब, रिंगण फिटनेस, सह्याद्री सायकल क्लब, टीम अर्जुन, टीम उदय, टीम भरत, आर बी सी बुलेट क्लब, मॉर्निंग ग्रुप, मेडिकल असोसिएशन यांसारख्या विविध गटांतील सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रॅलीला यशस्वी केले.महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ही रॅली पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, नागरिकांमध्ये सायकलच्या वापराबाबत जागृती निर्माण करणारी ठरली.
सायकल रॅलीचे उद्घाटन करताना आयुक्त पल्लवी पाटील.
सायकल रॅलीत सहभागी नागरिक व सायकलपटू
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








