इचलकरंजीत जुन्या वादातून हल्ला; २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल,१९ जणांना ४ दिवसाची कोठडी
इचलकरंजी:
सुर्यादयनगर येथील कनोजे कारखान्याजवळ सोमवारी रात्री ११ वाजता जुन्या वादातून चौघांवर दांडके, धारदार शस्त्रे व दगडाने हल्ला करण्यात आला.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.यातील १९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी सुशांत रानमाळे व त्यांचे मित्र नौशाद मुजावर, आयुब अत्तार आणि सागर शिकलगार यांच्यावर प्रज्वल हळदकर, युवराज जाधव, अमरनाथ जाधव, प्रशांत कुन्हाडे, जयंत कांबळे, शुभम कांबळे, ओम मोहीते, साहील शेवाळे, पुंडलीक बकरे, सुरज हिंगलजे, गणेश मोळे, राज धामके, योगेश कारवे, दुर्वांकुर खारखांडे, प्रशांत हावली, आकाश कांबळे, वेदांत पोळ, विश्वनाथ जाधव, मंगेश खांडेकर, उत्तकर्श पाटील, युवराज साठे व चंद्रदीप झुटाळ या आरोपींनी जीवघेणा हल्ला केला.पो नि. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गोडसे व चोथे तपास करत आहेत
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







