ICHMH51NEWS.IN
9921600800

बालीमध्ये डॉ. भूषण काळे यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बालीमध्ये डॉ. भूषण काळे यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान

बाली, इंडोनेशिया –
भारतीय आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणाऱ्या एका गौरवशाली क्षणात, आयुर्भूषण आयुर्वेदिक फर्टिलिटी आणि पंचकर्म सेंटरचे संस्थापक व प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण काळे यांना “पुरुष वंध्यत्वावरील उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार” तसेच “एक्सलन्स इन आयुर्वेदिक फर्टिलिटी पुरस्कार” प्रदान करण्यात आले.

हा सन्मान NIMA (National Integrated Medical Association) आणि NIMA OBGY Central यांच्या वतीने आयोजित International Conference on Reproductive Health & Fertility – Nimagynecon 2025 या परिषदेत देण्यात आला. हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ इंडोनेशिया आणि भारतीय वाणिज्य दूतावास, बाली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार भारताचे वाणिज्यदूत डॉ. शशांक विक्रम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. काळे यांचा शोधनिबंध “Evidence-Based Medicine in Ayurveda for Male Infertility – A Holistic Ayurvedic Approach” या विषयावर आधारित होता. यात आयुर्वेदातील रसायन, वाजीकरण, आहार-विहार आणि पंचकर्म यांचे आधुनिक दृष्टिकोनातून महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

डॉ. काळे हे कोल्हापूर, पुणे, मुंबई व इचलकरंजी येथे कार्यरत आयुर्भूषण आयुर्वेदिक फर्टिलिटी सेंटरचे संस्थापक आहेत. येथे स्त्री-पुरुष वंध्यत्वावर पारंपरिक आयुर्वेदिक व वैज्ञानिक पद्धतींचा संगम करून नैसर्गिक गर्भधारणेस मदत केली जाते.हा सन्मान भारतीय आयुर्वेद चिकित्सा प्रणालीच्या जागतिक प्रतिष्ठेचे प्रतीक ठरला आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा