KLE विद्यापीठात फिजिओथेरपीमध्ये दोन सुवर्णपदकांसह आदिती मालूने रचला इतिहास,समृद्धी इंडस्ट्रीजचे संचालक श्री. रमाकांत मालू यांची सुपुत्री आदितीची उल्लेखनीय कामगिरी
बेलगावी (प्रतिनिधी):
अलिकडेच KLE विद्यापीठ, बेलगावी येथे पार पडलेल्या भव्य दीक्षांत समारंभात समृद्धी इंडस्ट्रीजचे संचालक श्री. रमाकांत मालू यांची कन्या आदिती मालू हिने फिजिओथेरपी शाखेत दोन सुवर्णपदक मिळवून एक अत्यंत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे केवळ त्यांचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण शहराचा अभिमान वाढला आहे.
या विशेष समारंभात केंद्रीय आरोग्यमंत्री श्री. जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री श्री. प्रह्लाद जोशी तसेच KLE समाजाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे हे प्रमुख उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते आदितीचा सत्कार करण्यात आला.
सन्मान स्वीकारल्यानंतर आदितीने भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले,
“माझ्या या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या आई-वडिलांना आणि संपूर्ण कुटुंबाला जाते. त्यांचा सततचा पाठिंबा आणि आशीर्वादाशिवाय हे शक्य झाले नसते.”
समारंभात उपस्थित सर्व मान्यवरांनी आदितीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. हे यश मालू कुटुंबासाठी आणि समृद्धी इंडस्ट्रीजसाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







