ICHMH51NEWS.IN
9921600800

आवाडे जवाहर कारखान्याचे तळंदगेतील सभासद एआय तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी बारामतीला रवाना

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आवाडे जवाहर कारखान्याचे तळंदगेतील सभासद एआय तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी बारामतीला रवाना

इचलकरंजी:
कारखाना कार्यक्षेत्रातील तळंदगे येथे कारखाना पुरस्कृत जवाहर सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून ४०० एकरवर स्वयंचलित ठिबक सिंचन याेजना उभारण्यात आली आहे. या संस्थेच्या ठिबक सिंचनद्वारे आधुनिक ऊस शेतीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याेजनेतील सहभागी शेतकèयांना एआय तंत्रज्ञान वापरलेले प्लाॅट भेटी व प्रशिक्षणासाठी बारामती येथील कृषि विकास केंद्रास भेट देऊन माहिती घेण्यासाठी कारखान्याच्या वतीने तळंदगेतील पाणी पुरवठा संस्थेचे संचालक, सभासद व शेतकरी असे १०५, कारखान्याचे शेती खात्यातील १६ कर्मचारी असे एकूण १२१ प्रतिनिधी भेट देऊन एआयबाबत माहिती व मार्गदशन घेणार आहेत. तळंदगे येथून एआय प्रशिक्षण सहलीसाठी दाेन बस व दाेन ट्रॅव्हलर बारामतीला रवाना झाल्या.
याप्रसंगी कारखान्याचे केन कमिटी चेअरमन दादासाे सांगावे, संचालक आण्णासाे गाेटखिंडे, सूरज बेडगे, प्रकाश पाटील, जवाहर पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन सुरेश भाेजकर, व्हा. चेअरमन दिनकर साेलनकर, सर्व संचालक, कारखान्याचे जनरल मॅनेजर (केन) किरण कांबळे, अ‍ॅग्री ओव्हरसियर जयपाल गिरीबुवा, अजित चाैगुले तसेच सभासद शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी दाैèयात अटल एआय याेजनेच्या शुभारंभाची घाेषणा केली. एआयच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये प्रयाेग करून तंत्रज्ञान आधारीत शेती केल्यामुळे उत्पादकता दिडपटीने वाढविण्यासाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना व डीकेटीई या दाेन्ही संस्था ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ हाेण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करणार आहेत.
एआय म्हणजे कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून शेतक-यांना माती, पाणी, किड राेग व हवामान याचा अंदाज अगाेदर देणे. या तंत्रज्ञानामध्ये १ टाॅवर असून त्यामध्ये दाेन सेंन्सर असतात. हे सेंन्सर जमिनीमध्ये पिक वाढीच्या कालावधीनुसार ७ ते १४ इंच खाेल बसवावी लागतात. यामधील एक सेन्सर हा पिकास आवश्यक पाणी व दुसरा सेंन्सर हा पिकासाठी आवश्यक असणाèया खते व अन्नद्रव्यांची माहिती संबंधित शेतक-याला माेबाईलवर देताे. हे दाेन सेंन्सर १ हेक्टर क्षेत्राची माहिती देतात. याचा हेक्टरी खर्च २५ हजार रुपये इतका आहे. वेदर स्टेशन (हवामान मापक) हे २.५ कि.मी. च्या परिघामध्ये १ बसविणे. आवश्यक आहे. या स्टेशनमधून वातावरणातील बदल, संभाव्य येणा-या राेग किडींचा तसेच ऊस ताेडणीपूर्वी उत्पादनाचा अंदाजही समजू शकताे.
या एआय तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या ऊस विकास याेजनेतून करणेत येणार आहे. या याेजनेतून एआय तंत्रज्ञान १ हेक्टर क्षेत्रावरती बसविणेकरिता येणा-या रु. २५,०००/-खचपैकिी ५०% रक्कम कारखान्याकडून अनुदान स्वरूपात देण्यात येणार असून उर्वरीत ५०% रक्कम बिनव्याजी क्रेडीटवर कारखाना देणार असून 2 वर्षात गळीतास येणाèया ऊसाच्या बिलातून समान हप्त्यात वसूल केली जाणार आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा