ICHMH51NEWS.IN
9921600800

भरपावसातले डांबरीकरण बावचकरानी थांबवले,सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भरपावसातले डांबरीकरण बावचकरानी थांबवले,सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार

इचलकरंजी
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इचलकरंजी शहरात ५२ कोटी रुपयांच्या कामातून विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत.
त्यातील बिग बझार ते सीईटीपी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम आज भरपावसात सुरू होते,सदर प्रकार माजी नगरसेवक शशांक बावचकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून तात्काळ बंद करण्यास भाग पाडले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी येत असून यामध्ये सुधारणा होणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

आमदारांच्या सुचनांकडे कानाडोळा?

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत आ.राहुल आवाडे यांनी महापलिकेत आढावा बैठक घेऊन सूचना दिली,त्यानंतर २ ठिकाणी जागेवर जाऊन पाहणी केली एक ठिकाणी पावसात सुरू असलेले कामही परत करून घेतले व कामाच्या दर्जाबाबत हमी दिली तरीही असे प्रकार होत असल्याने आमदारांच्या सुचनेकडे कानाडोळा का होत आहे याची चर्चा सामान्य नागरिक करत आहेत.

पावसात सुरू असलेले डांबरीकरण.
Advt
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा