ICHMH51NEWS.IN
9921600800

३ कोटीच्या खंडणीप्रकरणी ५ जणांवर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

३ कोटीच्या खंडणीप्रकरणी ५ जणांवर गुन्हा

इचलकरंजी
संगमनगर, तारदाळ (ता. हातकणंगले) येथील रहिवासी कापड व्यावसायिकाकडून तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी आनंद श्रीनिवास मर्दा (वय ४७) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्नेहा नारकर हिने स्वत:ला स्टेट बँकेत क्रेडिट मॅनेजर असल्याचे भासवून व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्यात वैयक्तिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत फिर्यादीवर मानसिक दबाव टाकला संबंध न ठेवल्यास बदनामी करण्याची धमकी देत, आरोपी शांताबाई वळकुंडे (रा. यशवंत कॉलनी, इचलकरंजी), संतोष पाटील (रा.चिपरी), रामचंद्र (स्नेहा नारकर यांचा चालक), आणि शेखर गाडेकर (रा. जयसिंगपूर) यांनी संगनमताने सिग्नेचर हॉटेल व कार्यालयात भेटून फोनद्वारे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याची तक्रारीत नोंद आहे.
हा प्रकार १२ मे ते २५ मे २०२५ दरम्यान इचलकरंजी व कोल्हापूर परिसरात घडली. पोलीसांनी तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत.
Advt
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा