ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत गावठी पिस्तूलसह तरुण अटकेत – २६,००० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत गावठी पिस्तूलसह तरुण अटकेत – २६,००० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त

इचलकरंजी 

इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीवरून कारवाई करत एक गावठी पिस्तुल, मॅगझीनसह दोन जिवंत राऊंड असा एकूण २६,००० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ही कारवाई ६ जून रोजी टाकवडे वेस परिसरात करण्यात आली.पोलीस अंमलदार अमर शिरढोणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काळा टी-शर्ट व तपकिरी पॅन्ट परिधान केलेला इसम शस्त्रसाठ्यासह फिरत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून विनायक रमेश हिरेमठ (वय २४, रा. तोरणा नगर, गल्ली नं. १, शहापूर) यास अटक केली.त्याच्याकडून गावठी पिस्तुल, मॅगझीन व दोन जिवंत राऊंड असा एकूण २६,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर शस्त्र कोठून आणले व यामागे कोण शस्त्र रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.

Advt

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा