ICHMH51NEWS.IN
9921600800

तृतीयपंथी म्हणून जगताना आपल्या अस्तित्वासाठी झगडणार्‍या करणचे राज्यस्तरीय भव्य निबंध स्पर्धेत यश

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तृतीयपंथी म्हणून जगताना आपल्या अस्तित्वासाठी झगडणार्‍या करणचे राज्यस्तरीय भव्य निबंध स्पर्धेत यश

इचलकरंजी
पदवीधर प्रकोष्ठ ,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य ऑनलाइन  राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये जवळजवळ १३६५ निबंध प्राप्त झालेल्या महाविद्यालयीन गटामध्ये तृतीयपंथी असणाऱ्या करण पाटील याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
समाजाने आधीच झिडकारले,छक्का, हिजडा म्हणून हिणवले, तरीही हार न मानता दहावीत बोर्डात प्रथम आला.
Advt
बारावीतही  बोर्डात आला आणि त्याची यशाची घौडदौड आजही सुरूच आहे. जगण्याचा संघर्ष सुरूच आहे.
 पण येणाऱ्या प्रत्येक संकटाशी तो दोन हात करतो याचं खूप कौतुक आहे. त्याच्या या यशासाठी सर्वत्र त्याचे खूप खूप होत आहे. प्रा. डॉ.प्रतिभा भारत पैलवान यांच्या मायेचे सावली परिवाराचा तो एक अविभाज्य भाग आहे.
“धर्म, करुणा आणि कर्तृत्वाचे प्रतीक म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर!”
केवळ एक राजमाता नव्हे, तर समाजहितासाठी झटणारी एक जागृत सेविका होत्या त्या. काशीपासून रामेश्वरापर्यंत त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी आणि धर्मशाळांची उभारणी केली – त्या केवळ इमारती नव्हत्या, तर संस्कृतीच्या आधारस्तंभ होत्या.
त्यांच्या कार्याचा विस्तार हा केवळ राज्यकारभारापुरता मर्यादित नव्हता, तर त्यात धर्म, न्याय, आणि मानवसेवेचे मूल्य होते. अशा या आदर्श स्त्रीशक्तीला आज आपण मानाचा मुजरा करतो  कारण अहिल्याबाई म्हणजे दिव्यतेची आणि नेतृत्वाची जिवंत मूर्ती!
 याच दिव्यत्वाला नमन करण्यासाठी त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठ च्या वतीने भव्य अशा राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा