कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने सहकार क्षेत्रातील नवदृष्टीसाठी चर्चासत्र संपन्न – अंब्रेला ऑर्गनायझेशन व आधुनिक तंत्रज्ञानावर भर
इचलकरंजी
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने अंब्रेला ऑर्गनायझेशन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, महाराष्ट्र राज्य अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ. वैशालीताई आवाडे, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फेडरेशन अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबईचे सीईओ प्रभात चतुर्वेदी आणि पद्मभूषण बहादूरे प्रमुख उपस्थित होते.
या चर्चासत्राचे आयोजन महाराष्ट्र राज्य अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन, मुंबई आणि NUCFDC यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सौ. वैशालीताई आवाडे यांनी सहकार क्षेत्रातील बदल, नव्या शासकीय योजना, तसेच सहकारी बँकांच्या भविष्यातील संधी व आव्हानांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात अंब्रेला ऑर्गनायझेशनचे लाभ, तांत्रिक कार्यक्षमतेचा वापर, पारदर्शक व्यवस्थापन, आणि शाश्वत आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले.
Advt
यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन संजयकुमार अनिगोळ, संचालक मंडळ, जनरल मॅनेजर दीपक पाटील, किरण पाटील, तसेच इचलकरंजी व परिसरातील विविध सहकारी बँकांचे चेअरमन, संचालक, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चासत्रात भाग घेतलेले बँकिंग क्षेत्रातील मान्यवर
प्रभात चतुर्वेदी व पद्मभुषण बहादूरे यांचा सत्कार करताना चेअरमन स्वप्निल आवाडे व बँकेचे पदाधिकारी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








