ICHMH51NEWS.IN
9921600800

नगर पथ विक्रेता (फेरीवाले) समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण.इचलकरंजी फेरीवाले विकास आघाडीची एकहाती सत्ता स्थापन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नगर पथ विक्रेता (फेरीवाले) समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण.इचलकरंजी फेरीवाले विकास आघाडीची एकहाती सत्ता स्थापन

 

इचलकरंजी

केंद्र सरकारने पथ विक्रेतेसाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण जाहीर केले यानुसार पथ विक्रेते यांची समिती करण्याचे आदेश सरकारने राज्यातील सर्व नगरपरिषद व महानगरपालिका यांना दिले आहे. यानुसार इचलकरंजी महानगरपालिकेने पथ विक्रेता (फेरीवाला) समिती सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली असून सर्व निवड झालेल्या सदस्यांना निवड पत्राचे वाटप आयुक्त तथा समिती अध्यक्षा पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिका स्थापन झाल्या पासूनच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये इचलकरंजी फेरीवाले विकास आघाडीचे अध्यक्ष दिपक पाटील यांनी या समिती मध्ये एक हाती सत्ता स्थापन केली आहे.

इचलकरंजी महानगरपालिका च्या नगर पथ विक्रेता समितीमध्ये २० जणांचा समावेश आहे. पथ विक्रेत्यांच्या निवडणुकी द्वारे ७ सदस्य निवडून आले होते तर इतर मंडळे मधून 06 अशासकीय  सदस्य निवडण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त ह्या समितीच्या अध्यक्षा असणार आहेत तर पोलीस अधीक्षक, विशेष नियोजन प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी, सहायक पोलीस अधीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा,  मुख्य वैद्यकीय अधिकारी, अग्रणी बँक प्रतिनिधी असे  06 शासकीय अधिकारी सदस्य असणार आहेत.

इचलकरंजी फेरीवाले विकास आघाडीच्या सर्व 13 उमेदवारांची यामध्ये निवड झाली आहे.  समिती मध्ये इचलकरंजी फेरीवाले विकास आघाडीचे अध्यक्ष दिपक पाटील यांच्या भाजपा प्रणीत कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटनेचे ११ तर आघाडीचे गट नेते कॉ. सदा मलाबादे यांच्या लाल बावटा खोकी धारक संघटनेचे २ सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना निवडीचे पत्र महापालिका आयुक्त तथा समिती अध्यक्षा पल्लवी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

Advt

समिती च्या निवडीसाठी आघाडीचे मार्गदर्शक भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा. आमदार सुरेश हाळवणकर साहेबांचे विशेष सहकार्य लाभले असून खासदार मा. श्री. धैर्यशील दादा माने, माजी मंत्री मा. श्री. प्रकाश आण्णा आवाडे, आमदार मा. श्री. राहुल आवाडे साहेब, माजी आमदार मा. श्री. अशोकराव जांभळे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. रवींद्र माने, भाजप शहराध्यक्ष पै. मा. श्री. अमृत मामा भोसले, कॉ. मा. श्री. भरमा कांबळे,  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या पत्र वाटप वेळी उपायुक्त मा. श्री. अशोक कुंभार साहेब, सहाय्यक आयुक्त मा. श्री. विजय राजापुरे साहेब, नगरसेवक मनोज हिंगमिरे, किसन शिंदे, मिळकत व मार्केट व्यवस्थापक श्रीकांत पाटील, लिपिक सदानंद गोनूगडे, लिपिक अनिकेत राजापुरे आदी  उपस्थित होते.

समिती मध्ये दिपक अशोक पाटील, कॉ. सदाशिव अण्णाप्पा मलाबादे, सौ. अश्विनी अवधूत कुबडगे, सतीश वेणूगोपाल नायडू , मनीष राजशेखर नायडू, राकेश पुंडलिक माळी, सौ. लक्ष्मी हणमंत कांबळे, श्रीमती वेणूताई नामदेव पोवार, वासिम सलाउद्दीन बागवान, समीर दादासो सोलापुरे, श्रीमती सुवर्णा कृष्णात कुसाळे, श्रीनिवास नागाप्पा फुलपाटी, नितीन यशवंत परिट यांचा समावेश आहे

Advt

अतिक्रमण व चिकन सिक्सटी फाईव्ह व बिर्याणी गाड्याचे आश्वासन पाळण्याचे आव्हान.

इचलकरंजी शहरातील फेरीवाला समितीच्या निवडणुकीत फेरीवाले विकास आघाडीत काँग्रेस-भाजप- डावे पक्ष यांची एकत्रित आघाडी झाली होती त्यांनी पत्रकार परिषदेत इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही तसेच छत्रपती शिवतीर्थ ते गांधी पुतळा जवळील बिर्याणी व चिकनचे गाडे स्वतंत्र झोन करून स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते.आता सद्यस्थितीत हे आश्वासन कसे पाळणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

पथविक्रेता समितीची निवड प्रक्रिया पुर्ण झाल्यावर घेतलेले छायाचित्र.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा