लाडकी बहीण योजनेचे अनुदान दरमहा २०००/- करण्यासाठी प्रयत्नशील-रवींद्र माने. शिवसेना इचलकरंजीतर्फे विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप
इचलकरंजी–
शिवसेना इचलकरंजी शहराच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आणि वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते मातोश्री कार्यालयात करण्यात आले.
Advt
या प्रसंगी बोलताना रवींद्र माने यांनी सांगितले की, विरोधक ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. प्रत्यक्षात राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा १५००/- जमा होत असून हे अनुदान वाढवून २०००/- करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तसेच ‘लाडका भाऊ’ ही नवी योजना देखील कार्यान्वित करण्यात आली असून, राज्य सरकार सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वयोश्री योजनेअंतर्गत भरलेल्या १५०० अर्जांपैकी ७०० लाभार्थ्यांना एकूण ४५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याचेही श्री. माने यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला लाभार्थ्यांसह शिवसेनेचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये पंडित माने, माजी नगरसेवक इकबाल कलावंत, शहरप्रमुख भाऊसो आवळे, भोपाल वठारे, अमर बुचडे, वैशाली डोंगरे, सलोनी शिंत्रे, विलास माने, रमेश काळे, सुशील खैरमोडे, विनायक काळे, राहुल जाणवेकर, राहुल पाटील, राजू लायकर, मंगल वरुटे, राजेंद्र हजारे, सी.डी. लडगे, सुशील शिंदे, रवींद्र लायकर, अप्पासो येलाज, कमल काजवे, संदीप माने, विशाल कांबळे, अमित शिरगुरे यांचा समावेश होता. ज्येष्ठ नागरिक महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विविध योजनांचे मंजुरीपत्र वाटप करताना शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








