उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे फोटो पाठवा बक्षिस मिळवा-इमनपाची अभिनव योजना
इचलकरंजी
महानगरपालिका वर्धापन दिन आणि स्वच्छ भारत मिशन अभियाना अंतर्गत संपूर्ण शहरात महास्वच्छता मोहीम संपन्न झाली.शहरात रस्त्यावर अथवा इतरत्र कचरा टाकणाऱ्या नागरिकाचा फोटो काढून महानगरपालिकेच्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवा आणि दंडाच्या वसुली रकमेमधील २० % रक्कम बक्षीस स्वरूपात मिळवा असावं आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे.
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात महास्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ शहरातील कोल्हापूर मुख्य रस्त्यावरील ए.एस.सी. महाविद्यालया जवळ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या मोहिमेमध्ये शहरातील सर्वच वॉर्डमध्ये महानगरपालिकेचे सर्व विभागप्रमुख यांचे नियंत्रणाखाली आणि सदर वार्डमधील स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सर्व सफाई कर्मचारी यांच्या सहभागातून आजची महा स्वच्छता मोहीम यशस्वी रित्या राबवण्यात आली.
आजच्या मोहिमेदरम्यान शहरातील काही नागरिक आपल्या घराजवळ येणाऱ्या घंटागाडी मध्ये कचरा न टाकता रस्त्यावर, गटारीत अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याचे निदर्शनास आले. महानगरपालिकेकडून अशा बेशिस्त आणि बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. तरीसुद्धा काही नागरिक अजूनही कचरा घंटागाडीमध्ये न टाकता रस्त्यावर अथवा इतरत्र टाकत आहेत ही गंभीर बाब निदर्शनास आल्याने महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी याबाबत वेगळ्या स्वरूपाची कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागास दिलेले आहेत.
या अनुषंगाने शहरातील कोणत्याही परिसरात एखादा नागरिक आपल्या घरातील अथवा व्यवसायाच्या ठिकाणचा कचरा घंटागाडीमध्ये न टाकता रस्त्यावर अथवा इतरत्र ठिकाणी टाकत असल्याचे आढळून आल्यास सदर व्यक्तीचा जी.पी.एस. प्रणाली द्वारे फोटो घ्यावा आणि महानगरपालिकेच्या (70 30 60 39 39) या व्हाट्सॲप क्रमांका वर पाठवावा.
Advt
महानगरपालिका आरोग्य विभागाकडून सदर व्यक्तीस
रुपये ५००/- इतक्या दंडाची आकारण्यात येऊन या दंडाच्या रकमेपैकी २०% रक्कम बक्षीस स्वरूपात फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीस दिली जाईल. त्याच बरोबर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा फोटो महानगर पालिकेच्या अधिकृत सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येईल.
तरी शहरातील नागरिकांनी आपल्या घरातील अथवा व्यवसायाच्या ठिकाणचा कचरा इतरत्र न टाकता आपल्या परिसरात येणाऱ्या घंटा गाडीमध्ये टाकावा जेणेकरून दंडात्मक कारवाई सारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.
आजच्या महास्वच्छता अभियानामध्ये उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, सहा. आयुक्त विजय राजापुरे, रोशनी गोडे, आरोग्य अधिकारी डॉ.सुनीलदत्त संगेवार यांचेसह सर्व विभागप्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








