ICHMH51NEWS.IN
9921600800

डीकेटीई टेक्स्टाईलच्या अंतिम व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल लि.कंपनीमध्ये निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डीकेटीई टेक्स्टाईलच्या अंतिम व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल लि.कंपनीमध्ये निवड

इचलकरंजी:
  डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटमध्ये बी. टेक. इन टेक्स्टाईल्सच्या अंतिम वर्षातील १३ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयूव द्वारे निवड झाली आहे तर तृतीय वर्षातील ६ विद्यार्थ्यांची प्रि-प्लेसमेंटद्वारे वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड, लुधियाना, पंजाब,भोपाळ या नामांकीत कंपनीमध्ये निवड झाली आहे.
वर्धमान टेक्स्टाईल्स लिमिटेड ही एक देशभरात विख्यात कंपनी असून त्यांचे एकूण २२ हून अधिक उत्पादने आहेत.  भारतात गुजराथ, मध्यप्रदेश, पंजाब, भोपाळ अशा विविध राज्यांमध्ये त्यांच्या शाखा असून यामधून ते यार्न, ग्रे ऍन्ड प्रोसेस फॅब्रिक, सुईंग थे्रड आणि ऍक्रॅलिक फायबर इ. उत्पादनांची निर्मिती करतात.निवड झालेले विद्यार्थी  कमलकिशोर चौधरी, संदेश पिंगट, सुजल कदम, अदित्य कांबळे, आकाश पाटील, रितेश जाधव, प्रमोद शिंदे, रत्नदिप मुधाळे, प्रमोद देशमुख, दर्शन शहाणे, सुरज पाटील, दर्शन शिंदे व अनिकेत अतोळे हे सर्व अंतिम वर्ष टेक्स्टाईलचे शिक्षण संपादन करीत आहेत.
Advt

तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागातील श्रृती गुंड, पारस मलमे, सानिका नाईक, चिन्मयी मेळवंकी, सुमिरन पांडे, शंतनू देसाई या ६ विद्यार्थ्यांची विद्यावेतनावर इंटरनशिपसाठी निवड झाली आहे. डीकेटीईचे उत्तमोत्तम विद्यार्थी सर्वप्रथम घेता यावेत यासाठी कंपन्यातही चढाओढ सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर प्री प्लेसमेंट ऑफर्स देणा-या कंपनीच्या संख्येतही भर पडू लागली आहे. यामुळेच बारावीनंतर इंजिनिअरींग क्षेत्रातील एक सर्वोत्तम पर्याय म्हणून विद्यार्थी टेक्स्टाईल्सकडे आकर्षित होत आहेत.
विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवरती नोकरीच्या संधी उपलब्ध करुण देण्यास डीकेटीई ही संस्था अग्रेसर आहे. इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरऍक्शनमुळे विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या इंटरव्हयूवच्या वेळी आपली गुणवत्ता सिध्द करता येत आहे व यामुळे येथील विद्यार्थी प्लेसमेंटमध्ये आपली छाप पाडत आहेत असे गौरवोउदगार याप्रसंगी मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी व्यक्त केले.  Advt
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. एस.बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळी – डीकेटीईच्या टेक्स्टाईलमधील वर्धमान कंपनीत निवड झालेले विद्यार्थी सोबत संचालिका डॉ एल.एस.अडमुठे, डॉ यु.जे.पाटील व एस.बी.अकिवाटे.   

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा