ICHMH51NEWS.IN
9921600800

महापालिका वर्धापन दिन व वटपौर्णिमेनिमित्त इचलकरंजीत महिलांच्या हस्ते वृक्षारोपण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिका वर्धापन दिन व वटपौर्णिमेनिमित्त इचलकरंजीत महिलांच्या हस्ते वृक्षारोपण

इचलकरंजी:

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन आणि वटपौर्णिमेचे औचित्य साधून मंगळवार, दिनांक १० जून रोजी शहीद भगतसिंग उद्यान, अलायन्स हॉस्पिटल परिसर आणि कोले मळा येथे महिलांच्या हस्ते वडाच्या आणि देशी प्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

Advt

महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांची उपस्थिती होती.

यावेळी ५० वडाची आणि १०० देशी प्रजातींची रोपे महिलांच्या हस्ते लावण्यात आली. मारवाडी युवा मंचच्या अध्यक्ष अनिता जैन, सेक्रेटरी श्वेता जैन, सदस्य अनुराधा काबरा, माजी नगरसेविका धृवती दळवाई, संगिता आलासे, बिल्कीस मुजावर यांचाही सहभाग लाभला.

आयुक्त पल्लवी पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा आणि स्वच्छ, सुंदर व हरीत इचलकरंजीसाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले.

या वेळी माजी सभापती राजु बोंद्रे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, सुजाता दाभोळे, बेबी नदाफ, शुभांगी जोशी, संजय कांबळे, सुनील बेलेकर आणि महिला बचत गटाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. वृक्षारोपण कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

वृक्षारोपणात सहभागी आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे व महिला.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा