बेकायदेशीर प्रार्थना प्रकरणी हिंदुत्ववाद्यांच्या ठिय्यानंतर पोलिसांची जुजबी कारवाई.
इचलकरंजी-
इचलकरंजी येथील सोन्या मारुती मंदिराच्या मागे प्रार्थना व धर्मांतरण करत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते,संबंधितांनी पोलीस स्टेशनमधे येत बेकायदेशीररित्या जमाव जमवून प्रार्थना म्हंटली होती.
Advt
कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आज पोलीस ठाण्यात ठिय्या मारल्याने पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा हवाला देत फक्त बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाच कलमाखाली २८, जणांवर गुन्हा दाखल केला आहे, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर धार्मिक प्रार्थना घेतल्याच्या आरोपाखाली शिवाजीनगर पोलिसांनी तब्बल २८ पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अब्राहम आवळे,संजय आढाव,आलीस आवळे,अंकिता कांबळे,दिपा कांबळे,योगेश पवार,संदीप कदम,पवन खोत,राजु बेनाडे,सुनिल हेगडे,दिपक आवळे,रिजॉय राजन,संजय बनगे, सुभाष आवळे,राम केगार,नंदकुमार कांबळे,संजय रेंदाळकर आणि इतर १०-१५ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोसई साने करत आहेत.
चौकट:
दोन गटात वाद झाल्यानंतर पोलीस प्रशासन निष्पक्ष भूमिका घेत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रकरणावर पडदा टाकतात किंवा दोन्हीकडील कार्यकर्त्यांवर समांतर गुन्हे दाखल करतात मात्र इथे पोलिसांनी एका गटावर ७ कलमे लावत गुन्हे दाखल करून घेतले तर दुसरीकडे ठिय्या आंदोलनानंतर एका गटावर जुजबी कलम लावले या प्रकाराची जोरदार चर्चा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यात रंगली होती.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







