ICHMH51NEWS.IN
9921600800

सहकार भारती इचलकरंजी महानगर कार्यकारिणी स्थापना नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी विजय कामत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सहकार भारती इचलकरंजी महानगर कार्यकारिणी स्थापना,नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी विजय कामत

इचलकरंजी:
सहकार भारती इचलकरंजी महानगर कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी विजय विष्णु कामत, उपाध्यक्षपदी नरोत्तम लाटा व महामंत्रीपदी विश्‍वनाथ रोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advt

सहकार भारती महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख वैशाली आवाडे, महाराष्ट्र राज्य सहकार भारती सहकारी पतसंस्था प्रकोष्ट प्रमुख सागर चौगुले, महाराष्ट्र राज्य सहकार भारती विभागीय संघटक अ‍ॅड. जवाहर छाबडा, कोल्हापूर जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष अरविंद मजलेकर, कोल्हापूर जिल्हा सहकार भारतीचे सहसंघटक संजय सातपुते यांच्या उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या स्टेशन रोड कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी सहकार भारती इचलकरंजी महानगर कार्यकारिणीची स्थापना करण्यात येऊन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
नवनियुक्त पदाधिकार्‍यांमध्ये अध्यक्ष – विजय विष्णू कामत, उपाध्यक्ष – नरोत्तम लाटा, महामंत्री – विश्‍वनाथ रोडे, संघटक – सचिन पवार, सहसंघटक – श्रीकृष्ण खामकर, सचिव – राजेंद्र शिरगुरे, सहसचिव – प्रदीप कांबळे, कोषाध्यक्ष – नंदकुमार गोधडे, शहर संपर्कप्रमुख – श्रीकांत टेके, शहर संपर्क सहप्रमुख- दयानंद लिपारे, प्रशिक्षण प्रकोष्ट प्रमुख – विजय पवार, बँक प्रकोष्ट प्रमुख – चंद्रकांत चौगुले, पतसंस्था प्रकोष्ट प्रमुख – सूर्यकांत साखरे, सुतगिरणी प्रकोष्ट प्रमुख – दीपक पाटील, प्रोसेस प्रकोष्ट प्रमुख – आनंदा दोपारे, दूध डेअरी प्रकोष्ट – बाबू रग्गे , शेती विकास सेवा संस्था प्रकोष्ट – शिवाजी काळे, महिला प्रमुख – राजेश्री बाळकृष्ण मगदूम, महिला सहप्रमुख – शुभांगी किशोर पाटील यांचा समावेश आहे.
नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी सहकार भारतीचे कार्य आणि सहकार क्षेत्राची महती या आंतरराष्ट्रीय वर्षात सामान्य लोकांपर्यंत, सहकार क्षेत्रातील सभासदापर्यंत पोहोचवून सहकाराची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. या महिन्याच्या अखेरीस श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे सहकार भारतीचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर होणार असून त्यावेळी अधिकाधिक पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

Advt

फोटो – सहकार भारती इचलकरंजी महानगर शाखेच्या नवनियुक्त कार्यकारिणी समवेत वैशालीताई आवाडे, सागर चौगुले, ऍड. जवाहर छाबडा, अरविंद मजलेकर, संजय सातपुते आदी.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा