इचलकरंजीत आ.राहुल आवाडेंच्या सहकार्याने १०,००० वृक्ष लागवडीचा उपक्रम; वर्धापन दिनाचे औचित्य साधून हरित शहरासाठी पुढाकार
इचलकरंजी :
महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इचलकरंजी शहरात १०,००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. हा उपक्रम आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली, आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.
काल वटपौर्णिमेनिमित्त महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांची लागवड विविध ठिकाणी करण्यात आली. शहरातील सर्व विभागांमध्ये अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने वृक्षारोपण सुरू झाले आहे.
Advt
या उपक्रमाचा शुभारंभ नूतन शहापूर पोलीस स्टेशनजवळ व दाते मळा परिसरात पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Advt
महानगरपालिकेच्या मालकीच्या जागा, शाळा आणि रस्त्यांच्या कडेला देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात येणार असून, इचलकरंजी शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे.
वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करताना आयुक्त पल्लवी पाटील व अति आयुक्त सुषमा शिंदे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








