इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय,इचलकरंजी कायाकल्प मध्ये राज्यात प्रथम,६० लाखाचे बक्षिस
इचलकरंजी
महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कायाकल्प पथकाकडून इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाची दिनांक २८/०४/२०२४ रोजी तपासणी करण्यात आली होती. सदरच्या झालेल्या तपासणीमध्ये जिल्हा रुग्णालये या वर्गामध्ये इंदिरा गांधी सामान्य रुग्णालययाचा प्रथम क्रमांक आला असून ६० लाखाचे बक्षीस मिळाले आहे .
सदरच्या तपासणी साठी डॉ. सना अमरीन, पुणे येथील थेरगाव हॉस्पिटलच्या डॉ संध्या भोईर, प्रोग्राम मॅनेजर प्रियांका साबळे यांनी भेट दिली होती. या करिता मा. डॉ. दिलीप माने, उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर, मा डॉ सुप्रिया देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मार्गदर्शन लाभले. तसेच रूग्णालयाच्या डॉ. भाग्यरेखा पाटील वैद्यकीय अधिक्षिका, डॉ अमित सोहनी निवासी वैद्यकीय अधिकारी,
डॉ प्रकाश मोरे, शरीर विकृती शास्त्रज्ञ, रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी वर्ग- १ वर्ग २ मा.श्री. राजेंद्र पाटील, प्रशासकीय अधिकारी, श्री. भारत शिंदे, कार्यालयीन अधिक्षक, श्री. अविनाश चिले, कार्यालयीन अधिक्षक रुग्णालयाच्या श्रींम . चारुशिल्पा येमल, अधिसेविका, श्रीम. सीमा कदम, सहा.अधिसेविका, श्रीम. आशा शिंदे नोडल ऑफिसर ,रुग्णालयाच्या सर्व परिसेविका, रुग्णालयाच्या सर्व अधिपरिचारिका रुग्णालयाचे श्री. हरिचंद्र जाधव, मुकादम, सचिन साळुंखे, सहा.मुकादम तसेच रुग्णालयातील कार्यालयीन, रुग्णालयातील सर्व वर्ग-४ कर्मचारी अधिकारी रुग्णालयीन कर्मचारी, श्री. करण शिरोले, डेटा ऑपरेटर व ग्राफिक्स एडिटर या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







