ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी येथील नुतन न्यायाधिशांचा स्वागत समारंभ संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी येथील नुतन न्यायाधिशांचा स्वागत समारंभ संपन्न

इचलकरंजी:
 दि इचलकरंजी बार असोसिएशन, इचलकरंजी तर्फे नविन रुजू झालेल्या न्यायाधीशांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. मा. न्यायाधिशसोो जे.एल. गांधी यांचे स्वागत सिनिअर अॅड. अरुण बडवे यांनी केले. मा. न्यायाधिशसो एम.ए. भोसले यांचे स्वागत सिनिअर अॅड. संजय गजबी यांनी केले. मा. न्यायाधिशसो आर. एस. रोटे यांचे स्वागत सिनिअर अॅड. लालासाहेब गायकवाड यांनी केले. मा. न्यायाधिशसो जी.एम. नदाफ यांचे स्वागत सिनिअर अॅड. सुखदेव महाजन यांनी केले. मा. न्यायाधिशसो पी.एन. रोकडे यांचे स्वागत सिनिअर अॅड. दिगंबर निमणकर यांनी केले. मा. न्यायाधिशसो आर.डी. खराटे मॅडम यांचे स्वागत सिनिअर अॅड. डी.एम. लटके यांनी केले. मा. न्यायाधिशसो डी.बी. साठे यांचे स्वागत सिनिअर अॅड. डी. के. कंदले यांनी केले. मा. न्यायाधिशसोो ए.एम. गायकवाड मॅडम यांचे स्वागत सिनिअर अॅड. मृणाल माने यांनी केले. मा. न्यायाधिशसो ए. आर. कुलकर्णी यांचे स्वागत सिनिअर अॅड. श्रीकांत शिंदे यांनी केले. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे विधी अधिकारी म्हणून नियुक्त झालेबद्दल अॅड. भावना देवडा मॅडम यांचा सत्कार मा. जिल्हा न्यायाधिशसो जे. एल. गांधी यांचे हस्ते करणेत आला. यावेळी इचलकरंजी मध्ये तातडीने न्यायसंकुल होणे आवश्यक असून त्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करणेचे आश्वासन मा. जिल्हा व सत्र न्यायाधिशसो-1 श्री. जे. एल. गांधी व मा. जिल्हा व सत्र न्यायाधिशसो-2 एम.ए. भोसले यांनी दिले. यावेळी सर्व न्यायाधिशसोो यांनी आपला परिचय देऊन इचलकरंजी मध्ये कोर्ट कामांचा निपटारा वकिलांचे सहकार्याने जलद गतीने करणेसाठी प्रयत्नशील राहणेबाबत सांगितले.
यावेळी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी न्यायसंकुल कामाचा आढावा घेत मा. प्रमुख जिल्हा न्यायाधिशसो के.बी. अग्रवाल मॅडम, मा. जिल्हा व सत्र न्यायाधिशसो-1 श्री. जे.एल. गांधी, मा. जिल्हा न्यायाधिशसोो क्र.2 एम.ए. भोसले, मुख्यमंत्री यांचे विशेष सचिव विकास खारगे (आय.ए.एस.), इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील मॅडम, कोर्ट मॅनेजर खाडे मॅडम, सर्व न्यायाधिशसोो व वकिल संघटनेचे सर्व सदस्यांचे सहकार्याने न्यायसंकुलचे काम जलद गतीने करणेबाबत विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला प्रतिनिधी अॅड. हणबर मॅडम यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉ. सेक्रेटरी अॅड. अदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य अॅड. महेश कांबळे, अॅड. राहुल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.
स्वागत समारंभात मनोगत व्यक्त करताना आ.न्यायाधीशसो
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा