ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत युवतीवर धारधार शस्त्राने हल्ला – दोन अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत युवतीवर धारधार शस्त्राने हल्ला – दोन अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी (ता. १४ जून) – शहरातील विरगल्ली परिसरात एका २२ वर्षीय युवतीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी १३ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला.

फिर्यादी सौ. आशा चव्हाण (वय ४५, रा. विरगल्ली, इचलकरंजी) व त्यांची मुलगी पूजा चव्हाण (वय २२) बी चॅनेल केबल ऑफिसवरून परत येत असताना, दोन अनोळखी युवकांनी मोटारसायकलवरून येऊन पूजावर हल्ला केला. तोंडाला मास्क लावलेल्या आरोपींपैकी एकाने लोखंडी धारदार शस्त्राने पूजाच्या पोटावर वार करून तीला गंभीर जखमी केले व मोटारसायकल घेऊन डेक्कन चौकाकडे पसार झाले.

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा