शहापुर येथे जुन्या वादातून कोयत्याने युवकाचा खून
इचलकरंजी
– शहापुर येथे जुन्या वादातून कोयत्याने हल्ला करून एका युवकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना दिनांक १३ जून रोजी रात्री ८ वाजता घडली.
.मयताचे नाव गणेश रमेश पाटील (वय २१, रा. आगार, ता. शिरोळ) असून आरोपी अभिषेक सुकुमार मस्के (रा. आगार) याच परिसरातील आहे. दोघे पूर्वीचे मित्र असून दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादातून आरोपीने रागाच्या भरात कोयत्याने तोंड, डोके व मान या भागावर सपासप वार करून गणेशला ठार मारले.
या प्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,आरोपी अभिषेक मस्के याला ताब्यात घेण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक फौजदार धुमाळ तपास करीत आहेत.
संशयित-अभिषेक म्हस्के
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







