इनरव्हील क्लब तर्फे इचलकरंजी बस स्थानक येथे हिरकणी कक्षाची उभारणी
इचलकरंजी :
इनरव्हील क्लब तर्फे इचलकरंजी बस स्थानक येथे स्तनपान कक्षाचे सुशोभीकरण केले. त्याचे उद्घाटन इनरव्हील अध्यक्षा सौ. चंदा कोठारींच्या सासूबाई आदरणीय नीलाजी कोठारी, पीडीसी बिना बगाडिया, पीडीसी वैशाली लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्तनपान कक्षाला इनरव्हील क्लब तर्फे सुसज्ज पलंग, गादी, मच्छरदाणी सहित पाळणा, बेबी खुर्ची, कचरा बादली देण्यात आले. तसेच भिंतीवर प्रेरणादायक, आकर्षक स्लोगन चित्रीकरणाने सुशोभित करून दिले. स्तनपान कक्ष खूपच आल्हाददायक व सुंदर झाला आहे. सर्वांनी अवश्य भेट द्यावी. या कार्यक्रमाला अध्यक्षा सौ. चंदा कोठारी, सेक्रेटरी प्रेमलता सारडा, एडिटर विभा जैन, माजी अध्यक्षा सुनिता डालमिया, अनिता जैन, मीनाक्षी तंगडी, प्रेमा मर्दा, शिला रांदड, राखी बांगड व मेंबर उपस्थित होते. तसेच आगार व्यवस्थापक शिल्पा थोरात उपस्थित होते. स्तनपान करणाऱ्या आईला आरामदायक वाटावे, प्रवास करता यावे तसेच गरज वाटल्यास विश्रांती घेता यावी, बाळांस झोप मिळावी या उद्देशाने या कक्षाचे सर्वसामान्य जनतेला फायदा होईल. त्यासाठी एसटी महामंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Advt
हिरकणी कक्ष शुभारंभ प्रसंगी इनरव्हील क्लबच्या सदस्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







