रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये पहिल्याच दिवशी वृक्ष देऊन नवागतांचे पर्यावरणपूरक स्वागत.
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिका संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये आज ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवात इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या १२० चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेत पर्यावरणपूरक स्वागत करण्यात आले.
शाळेत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर इचलकरंजी महानगरपालिकेकडून मिळालेले शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि खाऊ उपायुक्त मा.अशोक कुंभार यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या वर्षीच्या प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्याच दिवशी एक रोपटे भेट दिले. या रोपाचे संगोपन विद्यार्थ्यांनी पालकांसह करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. हा उपक्रम पर्यावरणाच्या संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देणारा ठरला.
प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची सजवलेल्या वाहनांमधून वाजत-गाजत शालेय परिसरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, माजी नगरसेवक संजय भंडारे, मुख्याध्यापिका अलका शेलार, शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक राजेंद्र घोडके, बांधकाम विभागाचे आकाश पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेटके मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
उपायुक्त मा.अशोक कुंभार यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्यांनी पालकांना वृक्ष संवर्धनाचे आवाहन केले आणि शाळेच्या या स्तुत्य कामकाजाची प्रशंसा केली. त्यांच्या या शब्दांमुळे शाळेच्या या उपक्रमाला अधिक बळ मिळाले. हा ‘प्रवेशोत्सव’ विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण ठरला.
विद्यार्थ्यांच्या स्वागत प्रसंगी उपस्थित उपायुक्त अशोक कुंभार,प्रकाश मोरबाळे,संजय भंडारे,राजेंद्र घोडके,अलका शेलार व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








