ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहरातील सर्वच शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सोव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहरातील सर्वच शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सोव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

इचलकरंजी
 शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये  विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती लक्षणीय रित्या वाढवण्यासाठी तसेच समग्र शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी  शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने संपूर्ण राज्यात यावर्षी “शाळा प्रवेशोत्सव” हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्देशानुसार, इचलकरंजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागांमधील जवळपास १०० शाळांना  १०० अधिकारी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत केले, त्याचबरोबर दाखला वाटप प्रक्रिया सुलभ करणे आणि नवीन अभ्यासक्रमाचा प्रारंभ निर्विघ्नपणे सुनिश्चित करण्याकरिता महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या सह अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, सहा आयुक्त रोशनी गोडे, सहा.आयुक्त विजय राजापुरे यांचेसह महानगरपालिका विभाग प्रमुख तसेच अधिकारी  शहरातील सर्व शाळांना भेटी दिल्या.
    आजच्या शाळा प्रवेशोत्सोव सोहळ्यावेळी झालेल्या स्वागत समारंभामुळे नवागत विद्यार्थ्यांचे  चेहरे  आनंदाने फुलून गेले.
      आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी  महानगर पालिकेच्या सर्व प्राथमिक शाळा आणि राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलच्या  विद्यार्थ्यांना गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य वाटप सुरू करणेत आले.
             नियुक्त केलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी सक्रिय संवाद साधुन  शाळा व्यवस्थापनाशी विचार विनिमय करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्या साठी सर्वतोपरी सहकार्य करणेची ग्वाही दिली.
विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आयुक्त पल्लवी पाटील,शिक्षणाधिकारी इरफान पटेल व शिक्षक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा