ICHMH51NEWS.IN
9921600800

अरुण विद्यामंदिरमध्ये शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अरुण विद्यामंदिरमध्ये शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

इचलकरंजी :
अरुण विद्यामंदिर, इचलकरंजी येथील प्राथमिक विभागात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा प्रारंभ आनंददायी वातावरणात आणि उत्साहात झाला. प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने तब्बल ६० विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला.
Advt
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोकराव स्वामी यांनी उपस्थित पालकांचे स्वागत करत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप केले.कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ‘मोटू-पतलू’ या लोकप्रिय पात्रांच्या वेशात आलेले रिल स्टार बसवराज टकळकी यांनी मुलांचे भरपूर मनोरंजन करत वातावरणात आनंदाची उधळण केली.
यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी श्री. योगेश कोंडेकर, संस्थेचे सेक्रेटरी श्री. संग्राम स्वामी,श्री.सुनील तोडकर, श्री. चंद्रकांत बडवे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे औक्षण केले.
शाळेचे मुख्याध्यापक शसंजय कोळी सर यांनी शाळेची माहिती पालकांसमोर सविस्तर मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आसिफ वाटे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. प्रफुल्ल गायकवाड सर यांनी केले.या कार्यक्रमाला इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या सर्व शिक्षकांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा