शिवतीर्थ” परिसर नॉन व्हेज गाडे मुक्त“
इचलकरंजी:
इचलकरंजी शहरातील “शिवतीर्थ” च्या आजू बाजूला असणाऱ्या नॉनव्हेज गाड्यांचे स्थलांतर बाबत नगर पथ विक्रेता समिती मध्ये निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटना अध्यक्ष व पथ विक्रेता समिती सदस्य दिपक पाटील यांनी पुढाकार घेऊन येथील सर्व नॉनव्हेज विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून या सर्वांचे स्थलांतर इतरत्र केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
Advt
शहारात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. याच्या अनुषंगाने शहरातील सर्व चिकन ६५, बिर्याणी, तंदुरी या नॉन व्हेज चे गाडे बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले होते. परंतु सर्वांचे हातावरचे पोट असल्यामुळे आणि याच गाड्यावर सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्यामुळे महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांना संघटनेच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली.
Advt
परंतु सर्वानाच शिस्त लावणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे विक्रेत्यांचा उदरनिर्वाह चालावा व नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून नगर पथ विक्रेता समिती च्या बैठकीमध्ये नॉनव्हेज विक्रेत्यांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. यानुसार सर्वप्रथम शहरातील “शिवतीर्थ” २ चे काम लवकरच सुरु होणार असल्यामुळे या “शिवतीर्थ” च्या १०० मीटरच्या आत असणाऱ्या सर्व बिर्याणी, चिकन ६५ व तंदुरी विक्रेत्यांना इतरत्र हलवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटना अध्यक्ष व पथ विक्रेता समिती सदस्य दिपक पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व विक्रेत्यांची बैठक घेतली व इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांच्या सहकार्याने सर्व विक्रेत्याना रजिस्टर ऑफिस समोरील पार्किंग जवळ जागा उपलब्ध करून दिली आहे.
या ठिकाणचा सर्व परिसर विक्रेत्यांनी स्वच्छ करून स्वखर्चाने ४ एल.ई.डी. लाईट ची व्यवस्था केली असून या ठिकाणी “नॉन व्हेज खाऊ गल्ली” तयार केली आहे. “शिवतीर्थ” परिसरातील सर्वच १० विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे “शिवतीर्थ” परिसर हा नॉन व्हेज हात गाडा मुक्त करण्यात यश आले आहे.
यासाठी मा. आमदार सुरेशराव हाळवणकर, भाजपा इचलकरंजी शहराध्यक्ष पै.अमृत मामा भोसले यांचे मार्गदर्शन लाभले असून, इचलकरंजी शहराध्यक्ष सतीश नायडू, पथ विक्रेता समिती सदस्य सौ. अश्विनी कुबडगे, सौ. लक्ष्मी कांबळे, श्रीमती सुवर्णा कुसाळे, समीर सोलापुरे, मनीष नायडू, राकेश माळी, श्रीनिवास फलपाटी, श्रीमती वेणूताई पोवार, तसेच मिलिंद माने, महंमद देसाई, अरुण शेंडे, सुनील पाटील, सिद्धार्थ कांबळे, श्रावण सावंत यांच्यासह विक्रेते उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







