इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त स्पर्धा वॉल पेंटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहरातील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिका तसेच श्रेयांश ट्रेडर्स आणि वॅलसन्स यांच्या सहकार्याने शनिवार दि. १४ जून रोजी शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कंपौंडच्या भिंतीवर वॉल पेंटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
Advt
सदस्य स्पर्धेचा शुभारंभ उपायुक्त नंदू परळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या स्पर्धेमध्ये इचलकरंजी शहर आणि परिसरातील एकूण १२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये प्रथम क्रमांक प्रमोद कांबळे द्वितीय क्रमांक स्वप्निल मिठारी आणि तृतीय क्रमांक सिद्धू कुंभार यांनी पटकाविला आहे.
सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संजय बुगटे, शिवराय धनवडे आणि दिलीपकुमार सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
वॉल पेंटिंग स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वास पाटील आणि सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
वॉल पेंटिंग स्पर्धेवेळी उपायुक्त नंदू परळकर व पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








