महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर संपन्न
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही मोठी समस्या आहे. याची दखल घेत आयुक्त पल्लवी पाटील यांनी नागरी आरोग्य केंद्रांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर आयोजित केले.
Advt
या शिबिराचा शुभारंभ आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय राजापूरे, तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शोभा लांडे, डॉ. यास्मिन पठाण, डॉ. कौस्तुभ भोकरे, आणि डॉ. प्राची ढाले यांनी जवळपास ९० अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी केली. आवश्यकतेनुसार त्यांची रक्ततपासणीही करण्यात आली.
Advt
कार्यक्रमात उज्वला बारवाडे, दीपा रायमाने, सुवर्णा पवार, स्नेहा गवळी, सुशांत रानमाळे, प्रफुल्ल चोकाककर, सिद्धार्थ कदम, अभिषेक कांगणे, रोहन कांगणे, आसावरी लंगोटे, प्रणिता बुचडे यांसह नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गाने सक्रिय सहभाग नोंदवला.शिबिराच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
आरोग्य तपासणी शिबिरात डॉक्टरांचे स्वागत करताना आयुक्त पल्लवी पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







