ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू प्रदर्शन सुरू

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू प्रदर्शन सुरू

इचलकरंजी
    इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
            या अनुषंगाने आज मंगळवार दि.१७ जून रोजी महानगरपालिका आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील अधिकारी कर्मचारी यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंच्या प्रदर्शनाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, सहा.आयुक्त विजय राजापुरे, सहा.आयुक्त रोशनी गोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे,मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
Advt
          या प्रदर्शनात अमर जवान तुझे सलाम स्तंभ प्रतिकृती, जुन्या स्कूटर पासून तक्रार निवारण कक्ष, फिल्टर हाऊस प्रतिकृती, पवनचक्की, हेलिकॉप्टर, फुलदाणी, ट्री गार्ड बाटली प्रतिकृती, रॅक, युनिक सायकल, संत गाडगेबाबा प्रतिमा, सेल्फी पॉइंट, नायलॉन दोरी पासून एपीजे अब्दुल कलाम यांची प्रतिकृती, फ्लावर पॉट , मोटर सायकल आदी कलाकृती निर्माण केलेल्या आहेत.
   या प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व कलाकृती अत्यंत कल्पकतेने आणि सुबक रित्या निर्माण केल्याबद्दल आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व अधिकारी कर्मचारी अभिनंदन करुन हे प्रदर्शन दि.२९ जून पर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध ठेवणे च्या सुचना दिल्या.
    त्याचबरोबर शहरवासीय , शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करावयाचे असल्यास त्यांनी अशा वस्तू तयार करून या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले त्याचबरोबर शहर आणि परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले.

टाकाऊ पासून टिकाऊ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना आयुक्त पल्लवी पाटील, अति आयुक्त सुषमा शिंदे व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा