ICHMH51NEWS.IN
9921600800

खाजगी अकॅडमीतील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खाजगी अकॅडमीतील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

इचलकरंजी:
इचलकरंजीतील सुतार मळा परिसरातील भंडारे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय यश अजित यादव रा.सध्या भंडारे हॉस्टेल,मूळ गाव-पलूस,जिल्हा सांगली या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
यश हा मूळचा सांगली जिल्ह्यातील पलूस येथील रहिवासी असून, सध्या इचलकरंजीत खाजगी अकॅडमीत शिक्षण घेत असून राहण्यासाठी होस्टेलमध्ये वास्तव्यास होता. सकाळी बाथरूम मध्ये गेल्यानंतर बराच वेळ बाहेर न आल्याने आत गळफास लाऊन घेतल्याचे समजल्याने गंभीर अवस्थेत सेवासदन निरामय प्रा. लि. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून इचलकरंजी पोलीस ठाण्यात देण्यात आली.नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने आयजीएममध्ये  तणाव निर्माण झाला होता,त्यानंतर नातेवाईकांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केल्याने मृतदेह सीपीआर मध्ये हलवण्यात आला.याबाबत पोलीस उपनिरीक्षक माने,पोहेकॉ. कांबळे व हुजरे यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. पुढील तपास पो.ना. पाटील करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस तपास सुरू आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा