ICHMH51NEWS.IN
9921600800

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेसचे वतीने रक्तदान व फळे वाटप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेसचे वतीने रक्तदान व फळे वाटप

इचलकरंजी

देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेस पक्षाचे नेते माननीय राहुलजी गांधी यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरामध्ये ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी घट्ट केली तसेच शहर काँग्रेस कमिटीचे वतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये गोरगरीब रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या रक्तदान शिबीर व फळे वाटप कार्यक्रमाला शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे, मा. राहुलजी खंजीरे, शशांक बावचकर, बाबासाहेब कोतवाल, रविकांत वासुदेव, युवराज शिंगाडे, प्रमोद खडे, सचिन साठे, वेदिका कळंद्रे, प्रमोद नेजे, योगेश कांबळे, सतीश कांबळे, अवधूत वाडेकर, अण्णा कांबळे, डॉक्टर विलास खिलारे, राजन मुठाणे, अजित मिणेकर, नंदकिशोर जोशी, रवींद्र पाटील, पोपट शिंदे, रशीद ढालाईत रियाज चिकोडे, तैसिफ लाटकर, रविराज पाटील विद्या भोपळे, रमजान शिकलगार, प्रकाश धुमाळ इत्यादी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन रविकांत वासुदेव यांनी केले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा