ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रिकेट, जलतरण यांसारख्या स्पर्धांसह बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.

Advt-

महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या बुध्दीबळ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील व अतिरिक्त आयुक्त मा. सुषमा शिंदे (कोल्हे) यांच्या हस्ते संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये महानगरपालिकेचे एकूण २६ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Advt

या स्पर्धेत संदेश बंडगे (सफाई कामगार, आरोग्य विभाग) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मंगेश दुरुगकर (मुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभाग) यांनी द्वितीय तर संदीप मधाळे (स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभाग) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

स्पर्धेचे आयोजन व पंच म्हणून अजय जाधव यांनी काम पाहिले. याशिवाय क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे, तुषार कनोजे आणि युवराज भोसले यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

बुद्धिबळ स्पर्धेतील आयुक्त पल्लवी पाटील व अति आयुक्त सुषमा शिंदे यांच्यात रंगलेला सामना

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा