ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत जुन्या वादातून तरुणावर दगडफेक व मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत जुन्या वादातून तरुणावर दगडफेक व मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल

इचलकरंजी :

इचलकरंजी शहरातील आसरानगर भागात जुन्या वादातून तरुणाला गंभीर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविकांत घोलकर आणि अमोल कामते या दोघांविरोधात इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अजय संजय भोसले (वय २२, रा. आसरानगर गल्ली क्र. १०, इचलकरंजी) आणि त्याचे मित्र पृथ्वीराज जाधव व राहुल होसगणी हे सायकलवरून शहापूरकडे जात असताना आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. “तुम्ही मध्ये पडायचं नाही, आज पृथ्वीराजला जिवंत ठेवणार नाही” असे म्हणत रस्त्याच्या कडेला पडलेले दगड उचलून पृथ्वीराजच्या डोक्यावर व तोंडावर फेकून गंभीर जखमी केले.त्यानंतर जखमी अवस्थेतील पृथ्वीराज याला सौरभ माने याच्या दुचाकीवरून रुग्णालयाकडे नेत असताना बिरदेव मंदिर, पाटीलमळा येथे आरोपींनी पुन्हा गाठून त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी अजय भोसले यांच्या फिर्यादीवरून ग रविकांत चंद्रकांत घोलकर (वय ३२, रा. आसरानगर, गल्ली क्र. १०, इचलकरंजी) अमोल उर्फ रविंद्र शिवाजी कामते (वय २५, रा. आसरानगर, गल्ली क्र. ९, इचलकरंजी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इचलकरंजी पोलीस करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा