विनापरवाना पिस्तूल व ४ जिवंत काडतुसासह एकास अटक – शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
इचलकरंजी
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत अंकित सुभाषचंद्र केसरवाणी (वय २९), रा. योगायोग नगर गल्ली नं. १, इचलकरंजी याला अटक करण्यात आली आहे.
अंकित विनापरवाना अवैध पिस्तूल व चार जिवंत काडतुसे बाळगताना सापडला.त्याला अटक करून एकूण ६४,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करण्यात आली.या बाबत पोलीस कॉन्स्टेबल बाईत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मा. योगेश कुमार,अपर पोलीस अधीक्षक मा. निकेश खाटमोडे-पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी मा. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. दिलीप पवार,पो.उ.नि. संभाजी भोस्कर,सहा.फौ.रावसाहेब कसेकर,पो.कॉ. सुनिल बाईत, सदाम सनदी, सुकुमार बरगाले, अरविंद माने आणि पवन गुरव यांनी केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक संभाजी भोस्कर करीत आहेत.
आरोपीसह शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








