आ.राहुल आवाडे यांचा पॉवरलूम असोसिएशनतर्फे सत्कार
इचलकरंजी
सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांचा २०१५ पासून प्रलंबित बांधकाम परवाना व व्याज अनुदानाचा प्रश्न मार्गी लावलेबद्दल इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांचा दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन आणि शहर व परिसरातील यंत्रमाग उद्योजकांच्या तर्फे सत्कार करणेत आला.
Advt
गेली १० वर्षे या ना त्या कारणाने प्रलंबित असलेल्या प्रश्नामध्ये दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने सातत्याने पाठपूरावा केला व आमदार राहुल आवाडे यांनी यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री मा.उदय सामंत यांचेकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी संबंधीत उद्योजक व प्रमुख अधिकाèयांची मिटींग आयोजित केली. या मिटींगमध्ये ना.उदय सामंत यांचा सकारात्मक दृष्टीकोन व सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांना शासनाचे पाठबळ देण्याचा मानस यामुळे गेली १० वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागू शकला. मिटींग नंतरही आमदार आवाडे यांनी या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मिटींगचे मिनिट्स व त्यानंतर शासन निर्णय निर्गमीत करून घेतल्यामूळे फक्त आज कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० वर यंत्रमाग उद्योजक व इतर उद्योजकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबद्दल दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्व उद्योजकांच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. हा निर्णय होणेसाठी आमदार आवाडे यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे असलेची मते उपस्थित सर्व उद्योजकांनी व्यक्त केली.
Advt
या सत्कार समारंभास दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, प्रकाश मोरे, असोसिएशनचे संचालक सतीश कोष्टी, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, किरण पोवार, राजाराम गिरी, सि.ए. महेश पोतदार, सि.ए. गौरव गोंदकर, सि.ए. सुभाष चौगुले, उद्योजक गजानन होगाडे, दिनकर अनुसे, नामदेव कांबळे, निलेश हावळ, दयानंद छप्रे, अमोल कनवाडे, श्रीकांत टेके, सुरेश आमाशे, नागेश बोनगे, रोहित मेटे, खलील मैंदर्गी, सुशांत कलागते यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







