प्रभाग रचना पारदर्शकपणे करावी – महाविकास आघाडीची आयुक्तांकडे मागणी.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचना ही कोणत्याही राजकीय दबावाशिवाय व पारदर्शकपणे करावी, अशी लेखी मागणी महाविकास आघाडी इचलकरंजीकडून आयुक्तांना करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचना करण्यात येत असून, महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२५ रोजी यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे.
Advt
मागील काही निवडणुकांमधील प्रभाग रचनेतील त्रुटींमुळे उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या वेळी प्रभाग रचना करताना कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली निर्णय घेण्यात येऊ नयेत, तसेच सर्व प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असावी, अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, सयाजी चव्हाण, जावेद मोमीन, युवराज शिंगाडे, वसंत कोरवी, उदयसिंग पाटील, हेमंत वणकुद्रे उपस्थित होते
आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन देताना शशांक बाबचकर,सागर चाळके,उदयसिंग पाटील,सयाजी चव्हाण
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







