इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील २५ वॉर्डांमध्ये ‘ब्लॅक स्पॉट’ सौंदर्यीकरण उपक्रम.
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त जून महिन्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने सर्व २५ वॉर्डांमध्ये ‘ब्लॅक स्पॉट ब्युटीफिकेशन’ उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
या उपक्रमाचे नियोजन आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. उपायुक्त अशोक कुंभार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या-आपल्या वॉर्डांतील ओळखल्या गेलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’ जागांचे सौंदर्यीकरण केले.
वार्ड १, २, ४: गेस्ट हाउसजवळ – बाकडी बसवणे,वार्ड ५: व्यंकटराव हायस्कूल मागे – टायरमध्ये वृक्षारोपण,वार्ड ६: ब्रह्मकुमारी चौक – टायर झुंबर,वार्ड ९: अण्णाभाऊ साठे कमानीजवळ – कुंडीत वृक्षारोपण,वार्ड १४: षटकोन चौक – वृक्षारोपण,वार्ड १७: विवेकानंद कॉलनी – टायरपासून बाकडी,वार्ड १९: विराट हनुमान मंदिर – टायरपासून सेल्फी पॉइंट,वार्ड २५: तारदाळ रोड – टायरपासून मोटारसायकलअशा प्रकारे संपूर्ण शहरात विविध ठिकाणी कलात्मक, पर्यावरणपूरक व पुनर्वापर साहित्य वापरून सौंदर्यीकरण करण्यात आले.
Advt
काही ठिकाणी रांगोळी, सिमेंट पाईप, लाकूड व लोखंडी भंगार यांचा उपयोग करून आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या.
या उपक्रमांतर्गत आयुक्त पल्लवी पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्या समवेत काही वॉर्डांमध्ये भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक करत “शाब्बास” म्हणत त्यांच्या पाठीवर थाप देऊन उत्साहवर्धन केले. या प्रसंगी संबंधित परिसरातील नागरिकांनी देखील उपक्रमाचे कौतुक करत मनःपूर्वक अभिनंदन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







