महापालिकेच्या तत्परतेमुळे पंचगंगा नदीत आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेला वाचवण्यात यश
इचलकरंजी
शुक्रवारी १०:३० वाजता पंचगंगा नदीत आत्महत्या करण्यासाठी आलेली एक महिला इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तत्परतेमुळे वाचली.
महिलेचे नाव अंजली संजय वायदंडे (वय ५०, रा. लालनगर, इचलकरंजी) असे असून, ती घरगुती त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करत होती. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला सुखरूपपणे नदीतून बाहेर काढले आणि पुढील कार्यवाहीसाठी तिचा मुलगा संदीप संजय वायदंडे याच्या ताब्यात दिले.
या कार्यवाहीत इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे, आकाश आवळे, राहुल पोळ, देवानंद कांबळे, शाक्यानंद कांबळे, विकी जगताप, शितल जोती, आकाश सनदी, सुरेश वाघमारे, करण माळगे, अजित कांबळे यांचा मोलाचा सहभाग होता.तसेच, पोलीस बॉय असोसिएशनचे रमाकांत साळी, सुरज पाटील, गोपाल माने हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.महापालिकेच्या या तत्परतेमुळे एक अमूल्य जीव वाचला असून, नागरिकांतून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







