ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत घरफोडी; १.४५ लाखांचा ऐवज लंपास

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत घरफोडी; १.४५ लाखांचा ऐवज लंपास

इचलकरंजी – येथील कागवाडे मळा परिसरातील बालाजी अपार्टमेंटमध्ये दि. २६ जून रोजी दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान घरफोडीची घटना घडली असून, सुमारे १ लाख ४५ हजार ८०० रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रमेश नारायण कुलकर्णी (वय ६७) हे आपल्या कुटुंबासह बालाजी अपार्टमेंटमध्ये राहतात. आरोपी राकेश मारुती खोत आणि त्याची पत्नी योगिता राकेश खोत हे लंगोटे मळा येथे भाड्याने राहत असून, आरोपीची आई संगिता खोत ही फिर्यादीच्या घरी घरकामासाठी येत असे आणि तिच्याकडे घराची चावी होती.त्याचा गैरफायदा घेत आरोपींनी डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने कुलकर्णी यांचे घर उघडून घरात प्रवेश केला.कुलकर्णी यांचा मुलगा याने वेळोवेळी राकेशला वेगवेगळ्या कारणासाठी ५० लाख रुपये दिले आहेत.त्याबाबत दावा सुरू आहे.

या दरम्यान चोरट्यांनी घरातून चांदीच्या विविध भांडी व पूजावस्तू (एकूण वजन १ किलो ८६० ग्रॅम) व रोख ९०,००० रुपये असा एकूण १,४५,८०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात  आला असून तपास पो.स.ई. खोत पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा